World Cup 2023: 'प्लिज वर्ल्ड कपची मॅच बघायला जाऊ नका' नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांना – ABP Majha

By: एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क | Updated at : 17 Nov 2023 06:50 PM (IST)
Edited By: प्रियांका कुलकर्णी
Amitabh Bachchan ( Image Source : Instagram )
World Cup 2023:  15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (World Cup 2023) या सामन्यात भारताने 70 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचले होते. रणबीर कपूर, विकी कौशलसह इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स स्टेडियममध्ये मॅच बघायला पोहोचले होते.  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या होत्या. आता अमिताभ बच्चन यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 
अमिताभ बच्चन यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, “आता जावं की नाही याचा विचार करतोय” बिग बींच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेक नेटकरी हे आता  ‘प्लिज वर्ल्ड कपची मॅच बघायला जाऊ नका’ अशी विनंती अमिताभ बच्चन यांना करत आहेत. 
T 4832 – अब सोच रहा हूँ, जाऊँ की ना जाऊँ !

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी बिग बींना वर्ल्ड कप बघायला न जाण्याची विनंती केली आहे. कारण याआधी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट शेअर करुन सांगितलं होतं की, मी मॅच बघितली नाही की आपण जिंकतो. त्यामुळे आता अमिताभ बच्चन यांच्या “आता जावं की नाही याचा विचार करतोय” या ट्वीटनंतर नेटकरी बिग बींना मॅच बघायला न जाण्याची विनंती करत आहेत.  
T 4831 – when i don’t watch we WIN !

 विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. ज्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. आता भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या या सामन्यात कोण विजयी ठरणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
कल्कि 2898 AD ,गणपत,सेक्शन 84 आणि  तेरा यार हूँ मैं या अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 
संबंधित बातम्या:
Amitabh Bachchan : “तुम्ही कधी भांडी घासली आहेत का?”; स्पर्धकाचा बिग बींना प्रश्न; उत्तर देत अमिताभ बच्चन म्हणाले,”किचनपासून बाथरुमपर्यंत सर्व साफ करतो”
Vinod Thomas: प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 45 व्या वर्षी निधन; कारमध्ये आढळला मृतदेह
Tiger 3 Box Office Collection : ‘टायगर 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; लवकरच जगभरात पार करणार 400 कोटींचा टप्पा
Tiger 3 Box Office Collection : ‘टायगर 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; लवकरच जगभरात पार करणार 400 कोटींचा टप्पा
Miss Universe 2023: एक युनिक उत्तर अन् 23 वर्षाची शेनिस पॅलासिओस ठरली मिस युनिव्हर्स 2023! तो प्रश्न होता तरी काय?
Sanjay Gadhvi Passes Away: धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Uttarakhand: उत्तराखंडातील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची 8 दिवसानंतरही सुटका नाही, मृत्यूशी झुंज सुरू
IND vs AUS LIVE Final 2023: विराट कोहली-केएल राहुल मैदानात
India vs Australia 2023 World Cup Final : वर्ल्डकप मेगाफायनलच्या महामुकाबल्यात रोहित आणि विराटनं एकाचवेळी विश्वविक्रम रचला!
IND vs AUS: टीम इंडियाचे योद्धे, हातात बॅट नाही, जणू तलवार घेऊनच मैदानात येतात, गोलंदाजांवर तुटून पडतात
World Cup 2023 Final, Virat Kohali: हातातली बॅट जणू तळपती तलवार, गोलंदाजांना धडकी भरवतो ‘विराट’चा राकट अंदाज

source

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Join Whatsapp Group!
Scan the code