Amitabh Bachchan : तुम्ही कधी भांडी घासली आहेत का? स्पर्धकाचा बिग बींना प्रश्न उत्तर देत – ABP Majha

By: एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क | Updated at : 16 Nov 2023 02:34 PM (IST)
Edited By: मंजिरी पोखरकर
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan On KBC 15 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) रुपेरी पडदा गाजवण्यासह छोट्या पडद्यावरही अॅक्टिव्ह आहेत. बिग बी सध्या ‘कौन बनेगा करोडपती 15’ (Kaun Banega Crorepati 15) हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर ते व्यावसायिकसह वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत असतात. आता या कार्यक्रमाच्या मंचावर त्यांनी घरातील काम करण्याबद्दल भाष्य केलं आहे. 
‘केबीसी’च्या मंचावर असलेला हर्ष शाह नामक स्पर्धक अमिताभ बच्चन यांना थेट प्रश्न विचारतो की,”तुम्ही कधी घरातील भांडी घासली आहेत का? यावर उत्तर देत अमिताभ बच्चन म्हणतात,”मी आजवर अनेकदा भांडी घासली आहेत. स्वयंपाकघरातील चिमनी साफ केली आहे. बाथरूममधील बेसिनदेखील साफ केलं आहे. मी घरातील काम करू शकत नाही, असं तुम्हाला का वाटलं?”. 
अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षीदेखील मनोरंजनसृष्टीत अॅक्टिव्ह आहेत. टायगर श्रॉफ आणि कृती सेननच्या ‘गणपत’ या सिनेमात ते शेवटचे झळकले होते. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. पण या सिनेमातील बिग बींच्या कामाचं कौतुक झालं. अमिताभ बच्चन आता प्रभास-दीपिकाच्या ‘कल्कि 2889 एडी’ या सिनेमात झळकणार आहेत. तसेच रजनीकांतसोबत ते ‘थलायवा 170’ या सिनेमात स्क्रीन शेअर करताना दिसतील.
A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


अमिताभ बच्चन अनेकदा ‘केबीसी 15’च्या मंचावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित गोष्टींवर भाष्य करत असतात. याआधी एका स्पर्धकासोबत बोलताना ते म्हणाले होते,”बीएसीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मी दिल्लीहून चंदीगढला सायकलवरून गेलो होतो. त्यानंतर तिथे अॅडमिशन न मिळाल्याने मी पुन्हा दिल्लीला आलो. शेवटी दिल्लीच्याच कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला”. 
‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 15) हा कार्यक्रम 2000 पासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 2000 पासून आजही या कार्यक्रमाची क्रेझ कायम आहे. अमिताभ बच्चन पहिल्या पर्वापासून हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 
संबंधित बातम्या
Bigg Boss 17 : ‘बिग बॉस 17’चा विजेता कोण होणार? अर्चना गौतमने केला ‘TOP 5’ फायनलिस्टचा खुलासा
Namrata Sambherao : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी नम्रता संभेराव! जाणून घ्या ‘लॉली’बद्दल…
Thipkyanchi Rangoli : प्रेमाच्या रंगांनी भरून पूर्ण होणार ‘ठिपक्यांची रांगोळी’; ‘या’ दिवशी पार पडणार शेवटचा भाग
Kon Honar Crorepati : बदलापूरमधील गृहिणीची आयुष्यातील पहिली कमाई थेट केबीसीमध्ये; 25 लाखांची रक्कम जिंकली
Onkar Bhojane : ओंकार भोजने खरंच पुन्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात दिसणार? ‘त्या’ प्रोमोमुळे चाहत्यांचा गोंधळ
Jalna OBC Sabha : जालन्यात ओबीसींचा महाएल्गार; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या
भाजप – शिंदे गटात कमानीच्या नामकरणावरून वाद; भाजप विरोधात शिंदे गटाचे आमरण उपोषण
Navi Numbai Metro : नवी मुंबई मेट्रोमध्ये कुठले स्टेशन? तिकीटदर कसे असणार?
मोठी बातमी! महायुतीतल्या लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, कोण आहेत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार?
OBC Sabha: ‘ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणं आमचं कर्तव्य’, जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा

source

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Join Whatsapp Group!
Scan the code