Amitabh Bachchan : तालिबानकडून बिग बींचं कौतुक यापूर्वी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही – ABP Majha

By: एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क | Updated at : 08 Oct 2023 07:40 AM (IST)
Edited By: मंजिरी पोखरकर
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. बिग बी (Big B) यांची लोकप्रियता फक्त देशापुरतीच मर्यादित नसून परदेशातही त्यांची चांगलीच क्रेझ आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही ते फिल्मी दुनियेत रमले आहेत. आजही ते वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवत आहेत. प्रकृतीच्या समस्यांवर मात करत ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालेत. अशातच आता तालिबानने (Taliban On Amitabh Bachchan) मेगास्टार अमिताभ बच्चन यांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. 
लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळी अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते आहेत. आता तालिबान जनसंपर्क विभागाने (Taliban Public Relations Department) एक ट्वीट करत अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं आहे. बिग बींचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,”अमिताभ बच्चन हे भारतीय अभिनेते आहेत”. 
Amitabh Bachchan is an Indian actor and a masculine individual who is well-liked in Afghanistan. Few people are aware that he is an honorary Afghan citizen. When he visited our magnificent nation in the 1980s, President Najibullah bestowed this distinguished accolade upon him. pic.twitter.com/ZTvupuP7lm

तालिबानने पुढे लिहिलं आहे,”अफगाणी (Afghanistan) लोक अमिताभ बच्चन यांना पुरुषात्वाचे आदर्श प्रतीक मानतात. अमिताभ बच्चन यांचा अफगाणिस्तानाकडून सन्मान करण्यात आला आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. 1980 मध्ये ते अफगाणिस्तानात आले होते. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांनी अमिताभ बच्चन यांचा विशेष सन्मान केला. तालिबानचं हे ट्वीट व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांचा ‘खुदा गवाह’ हा सिनेमा 1992 मध्ये रिलीज झाला. या सिनेमाच्या शूटिंगसाठी बिग बी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तान सध्या तालिबानच्या ताब्यात आहे. ‘काबुल एक्सप्रेस’सह अनेक बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग अफगाणिस्तानमध्ये झालं आहे.
‘खुदा गवाह’ या सिनेमात अभिताभ बच्चन यांच्यासोबत श्रीदेवीदेखील मुख्य भूमिकेत होत्या. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या सिनेमातील गाण्यांना संगीत दिलं आहे. 8 मे 1992 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या सिनेमातील कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, संगीत, पटकथा अशा सर्वच गोष्टींचं कौतुक झालं होतं. जगभरात या सिनेमाने 17.9 कोटींची कमाई केली. भारतासह अफगाणिस्तानातही या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. 
अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित ‘कोर्टरून ड्रामा सेक्शन 84’मध्ये ते दिसणार आहेत. तसेच दीपिका पदुकोण आणि प्रभास स्टारर ‘कल्की 2898 एडी’ या सिनेमातही ते झळकणार आहेत. टायगर श्रॉफ आणि कृती सेनन अभिनीत ‘गणपत’ सिनेमातही एका खास भूमिकेत ते दिसणार आहेत. 
संबंधित बातम्या
National Cinema Day 2023: ‘झिंगाट’ ते ‘बाई पण भारी देवा’; अशी मराठी गाणी ज्यांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये थिरकायला लावलं
Nitin Gadkari: ‘गडकरी’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार नितीन गडकरी यांची भूमिका; चित्रपटाचं नवं पोस्टर पाहिलंत?
Sam Bahadur Teaser Out: सॅम बहादुर चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज; विकी कौशल आणि फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत
National Cinema Day 2023: आज आहे राष्ट्रीय चित्रपट दिन; शाहरुखचा ‘जवान’ ते अक्षयचा ‘मिशन रानीगंज’, 99 रुपयांत पाहा ‘हे’ चित्रपट
Half Love Half Arranged: प्रेम, लग्न आणि नात्यांची गुंतागुंत; कशी आहे ‘हाफ लव्ह हाफ अरेंज’ वेब सीरिज? वाचा रिव्ह्यू
सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर राहुल नार्वेकर बॅफूटवर, म्हणाले, कोर्टाचा आदर राखू, विधिमंडळाचे सार्वभौमही टिकवू
पाकिस्तानविरोधातील सामन्यापूर्वीच रोहितच्या हातात सोन्याचा ‘वर्ल्डकप’, फोटो व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तानला 166 धावांत गुंडाळलं, भारताचा 4 धावांनी विजय, सचिन-अख्तरच्या टशनपेक्षा पहिल्या वनडेतील जबरदस्त थरार
India Vs Pakistan World cup 2023 : पाकिस्तानची भले मागील सामन्यात रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी पण हे 5 विक्रम स्वप्नातही मोडू शकत नाही!
Rohit Pawar : रोहित पवारांची याचिका फेटाळून लावा, प्रदूषण मंडळ आक्रमक, हायकोर्टाला विनंती

source

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Join Whatsapp Group!
Scan the code