Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मार या एफएमसीजी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 38390 कोटी रुपये आहे. अदानी विल्मार कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 678 रुपये होती. तर आता या कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका महिन्यात अदानी विल्मर कंपनीच्या शेअरची किंमत 14 टक्क्यांनी खाली आली आहे. आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी विल्मार स्टॉक 0.10 टक्के वाढीसह 296.85 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
मागील 6 महिन्यांत अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 24 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तर मागील 10 महिन्यांत हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 51 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका वर्षात अदानी विल्मार कंपनीच्या शेअरची किंमत 56 टक्क्यांनी कमजोर झाली आहे.
2023 या वर्षात अदानी विल्मार स्टॉकची किंमत 55 टक्क्यांनी खाली आली आहे. अदानी विल्मार कंपनी गौतम अदानी समूह आणि विल्मार इंटरनॅशनल यांनी स्थापन केलेला संयुक्त उपक्रम आहे. मागील काही दिवसांपासून या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर 2023 तिमाहीत, अदानी विल्मर कंपनीने ऑपरेशनल महसूलात वार्षिक आधारावर 13.3 टक्क्यांची घट नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीचे महसूल संकलन 141 अब्ज रुपयेवरून घसरून 122 अब्ज रुपयेवर आला आहे. कंपनीच्या खर्चात कपात झाली असली तरी कंपनी अजूनही तोट्यात आहे. स्पॉट आणि फ्युचर्स रेट स्पॉट आणि भविष्यातील किमतीच्या अस्थिर ट्रेंडमुळे खाद्यतेल क्षेत्रात जबरदस्त आव्हाने निर्माण झाली आहेत.
सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत खाद्यतेलाच्या किमती 6 टक्क्यांनी घसरली होती. अदानी विल्मर कंपनीच्या फूड आणि एफएमसीजी विभागाने 26 टक्के महसूल वाढ नोंदवली आहे. अदानी विल्मार कंपनीच्या महसुलात खाद्यतेल विभागाचा वाटा 74 टक्के आहे.
अदानी विल्मार कंपनीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे, करत गौतम अदानी यांनी कंपनीतील आपले शेअर्स विकल्याची बातमी येत आहे. यासह मीडिया रिपोर्टनुसार गौतम अदानी समूह अदानी विल्मार कंपनी आपले 44 टक्के भाग भांडवल विकू इच्छित आहे. आणि हा करार पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. अदानी समूहाने आपल्या संयुक्त उपक्रमातील आपले भाग भांडवल विकून तीन अब्ज डॉलर्स जमा करण्याची योजना आखली आहे. अदानी समूह आपल्या पायाभूत सुविधांच्या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Tata Steel Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. टाटा स्टील कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाला विश्वास आहे की कंपनीचे भारत, यूके आणि नेदरलँड्समधील उत्पादन आणि विक्री तिसर्या तिमाहीपासून वाढू शकते. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये जाहीर केली आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक जबरदस्त कामगिरी करत आहे.
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, विकास लाइफकेअर कंपनीची मटेरियल सहयोगी कंपनी जेनेसिस गॅस सोल्युशनला गुजरात गॅस लिमिटेड कंपनीने 40,000 गॅस मीटरचा पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे. जेनेसिस गॅस सोल्युशन ही कंपनी विकास लाइफ केअर कंपनीची उपकंपनी मानली जाते.
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनी आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात एक लोन सेटलमेंट करार झाला होता. जा करारामुळे अनेक बँकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीला कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी आयसीआयसीआय बँकेला पत्र लिहून हा करार मागे घेण्याची मागणी केली आहे.
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मे 2019 नंतर व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा 14 रुपये किंमतीच्या पार गेले आहेत. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 14.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 16 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीसह मोठ्या व्हॉल्यूममध्ये ट्रेड करत होते. शुक्रवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 76,621,601 च्या व्हॉल्यूमसह ट्रेड करत होता. मागील.एका वर्षात, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 4 पट अधिक वाढवले आहेत.
राज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.
Email us:
[email protected]