Adani Power Vs Tata Power Share | अदानी पॉवर शेअर्समध्ये तेजी, 6 … – Maharashtranama News

Adani Power Vs Tata Power Share | अदानी पॉवर स्टॉकमध्ये सध्या वाढीचे संकेत मिळत आहेत. मागील काही दिवसापासून अदानी पॉवर स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पहायला मिळत आहे. दोन गुंतवणूक संस्थांनी 5 ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान खुल्या बाजारातून अदानी पॉवर कंपनीचे 2.2 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते.
या गुंतवणूक करणाऱ्या संस्थामध्ये फोर्टिट्यूड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि इमर्जिंग मार्केट्स इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या दोन कंपन्या आहेत. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.21 टक्के वाढीसह 376.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
स्टॉक खरेदी तपशील
फोर्टीट्यूड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या दोन गुंतवणूक संस्थांनी अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून 2.2 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. Fortitude Trade & Investment कंपनीने 5-21 सप्टेंबर 2023 दरम्यान अदानी पॉवर कंपनीचे 6,58,47,000 शेअर्स खरेदी करून 1.71 टक्के भाग भांडवल ताब्यात घेतले आहे. इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट कंपनीने 21 ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान अदानी पॉवर कंपनीचे 1,92,00,000 शेअर्स खरेदी करून 0.5 टक्के भाग भांडवल ताब्यात घेतले आहे.
शेअरची कामगिरी
अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 374.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत अदानी पॉवर स्टॉक 115.36 टक्के मजबूत झाला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 173 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर आली आहे. YTD आधारे अदानी पॉवर स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 25.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,474.16 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Cheque Bounce Case | लोकांना बँकांशी जोडण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. याच कारणामुळे आज देशातील बहुतांश लोकसंख्येचे बँक खाते आहे. लोककल्याणकारी योजनांच्या पात्र व्यक्तींना अनुदानाची रक्कम आणि देण्यात येणारी मदत ही सरकार थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करते. बँकेशी संबंधित व्यक्तीही कधी ना कधी धनादेशाचा वापर करते. तुम्हीही ते केलं असेलच.
LIC Online Payment | जर तुमची एलआयसी पॉलिसी बंद झाली असेल तर ती पुन्हा सुरू किंवा पूर्ववत केली जाऊ शकते. यासाठी कोणतेही विलंब शुल्क आकारले जात नाही. एलआयसीने म्हटले आहे की ते 67 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत आणि त्याचे स्मरण करण्यासाठी एक विशेष पुनरुज्जीवन मोहीम चालविली जात आहे, ज्याअंतर्गत बंद पॉलिसी पुन्हा सक्रिय केली जाऊ शकते. पॉलिसी अॅक्टिव्हेट करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 आहे.
Infosys Share Price | इन्फोसिसचे सहसंस्थापक एस. डी. शिबूलाल यांचा मुलगा श्रेयस शिबूलाल आणि सून भैरवी मधुसूदन शिबूलाल यांनी गुरुवारी कंपनीतील आपला हिस्सा एकूण 435 कोटी रुपयांना विकला. आता कंपनीतील त्यांचा हिस्सा 0.64 टक्क्यांवरून 0.58 टक्क्यांवर आला आहे. खुल्या बाजारातून या शेअर्सची विक्री करण्यात आली आहे. इन्फोसिसमध्ये नारायण मूर्ती कुटुंबाचा सर्वात मोठा हिस्सा आहे.
PTC India Share Price | पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ONGC लिमिटेड कंपनीने PTC इंडियाची उपकंपनी विकत घेण्यासाठी सर्वात मोठी बोली जाहीर केली आहे.
Penny Stocks | सध्या शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. याकाळात मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. तर त्याउलट पेनी स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे वर्षानुवर्षे चांगला लाभांश देतात, आणि मजबूत परतावा देखील देतात.
Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 975 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात पेटीएम स्टॉकची किंमत 86 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 124 टक्के परतावा कमावून दिला आहे.
राज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.
Email us:
[email protected]

source

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Join Whatsapp Group!
Scan the code