Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मजबूत तेजी … – Maharashtranama News

Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने नऊ पट वाढीसह 6,594 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. अदानी पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, वाढते उत्पन्न आणि कर आघाडीवर मिळालेला दिलासा यामुळे कंपनीच्या नफ्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 7.71 टक्के वाढीसह 393.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी पॉवर स्टॉक 2.52 टक्के वाढीसह 382.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अदानी पॉवर कंपनीने गुरुवारी निवेदनात माहिती दिली आहे की, “चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 848 टक्क्यांच्या वाढीसह 6594 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी 2022-23 या आर्थिक वर्षात जुलै-सप्टेंबर या तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 696 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. अदानी पॉवर कंपनीच्या करपूर्व उत्पन्नात सुधारणा झाली आहे, यासोबत उत्पन्न आणि कर आघाडीवर मिळालेली सवलत या सर्व सकारात्मक बाबीमुळे अदानी पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे.
2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 61 टक्के वाढीसह 12,155 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 7,534 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
अदानी पॉवर कंपनीच्या मते, कंपनीच्या उत्पन्नात इतकी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीचे वीज विक्रीचे प्रमाण खूप वाढले आहे. अदानी पॉवर कंपनीची स्थापित थर्मल पॉवर निर्मिती क्षमता 15,210 मेगावॅट आहे. या कंपनीचे वीज प्रकल्प गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यात स्थित आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Stocks in Focus | सरकारी बँकांनी सप्टेंबर 2023 तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सरकारी बँकांच्या नफ्यात आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. शेअर बाजारात अनेक सरकारी बँकांचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, मात्र तज्ञांनी अल्पकालीन गुंतवणुकीसाठी कॅनरा बँकेच्या शेअरची निवड केली आहे. तज्ञांनी कॅनरा बँकेचे शेअर्स 3 महिन्यांसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 387.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कॅनरा बँकेने 26 ऑक्टोबर 2023 रोजी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 390 […]
Multibagger Stocks | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्च करणार आहोत, त्याचे नाव आहे, मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड.
Stocks To Buy | यूएस फेडरल रिझर्व्हने दुसऱ्यांदा आपल्या व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणून जगातील सर्व शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार देखील मागील दोन दिवसापासून तेजीत ट्रेड करत आहे. अशा काळात गुंतवणूक करून कमाई करण्यासाठी तज्ञांनी 3 सर्वोत्तम शेअर्स निवडले आहेत. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर तपशील
Atul Auto Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणूक केली आहे. विजय केडियाच्या पोर्टफोलिओमध्ये अतुल ऑटो लिमिटेड कंपनीचे 50,50,505 शेअर्स आहेत. विजय केडीया यांनी अतुल ऑटो कंपनीचे एक 18.20 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
Bonus Shares | गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुश खबर आहे. दिवाळीपूर्वीच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप केले आहेत. गिरीराज सिव्हिल कंपनीने नुकताच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच कंपनीने आपल्या शेअरधारकांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स दिले आहेत. Giriraj Civil Developers Share Price
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी स्थानिक चलन रोख्यांच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 1.8 अब्ज डॉलर्स भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. जर रिलायन्स कंपनीने ही भांडवल उभारणी केली तर ती चलन रोख्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली सर्वात मोठी बाँड विक्री ठरेल.
राज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.
Email us:
[email protected]

source

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Join Whatsapp Group!
Scan the code